आज जागतिक मातृदिन. तसं पाहिलं तर माझ्या आईला जाऊन अर्धशतक केव्हाच उलटुन गेलं. माझ्या संसाराचा फापटपसारा वाढला आणि आईची आठवण पुसट होत गेली. ती गेली तेव्हा मी फक्त ११ वर्षांची होते. शिशु वयातील ५ वर्षे सोडली तर उरलेली ५-६ वर्षे तीही नाकळत्या वयातली. आईचे सुख मला तसे मिळालेच नाही. आपल्याला आवडणारं एखादं मधुर पौष्टिक फळ सहज हातात यावं, ते खाण्यासाठी थोडा तुकडा तोडावा आणि ते मजेत खात असताना त्याची मस्त चव जिभेवर रेंगाळत असतानाच ते फळ कुणीतरी हिसकावून दुर पळून जावं अगदी तसंच माझं आईच्या सुखाबाबत झालं. काय आहे ? अशा अर्धवट सुखाचा चटका जरा जास्तच जोरात बसतो. फोड येत नाही पण आग होत राहते.
आठवत नसलेल्या आईसाठी सुध्दा हृदयाचा एक कोपरा रिकामा असतोच. कशी असेल माझी आई ?मला सोडून जाताना तिला काय वाटलं असेल ? मी तिच्या उदरात असताना तिने माझ्याबद्दल काय ठरवलं होतं ? माझे किती लाड केले असते? मी कोण व्हावं असं तिला वाटतं होतं ? असे खुप सारे प्रश्न मनात येतात... म्हणजे एखाद्या सुंदर, मधुर फळाची चव तर मिळुच नये, पण ते बघायला सुध्दा मिळू नये हा सल मनात सारखा सलत असतो. मग तो प्रत्येक स्त्रीमधे आई बघु लागतो. चिडणारी, रागावणारी प्रेम करणारी, जेऊ घालणारी, कडेवर घेणारी, शाळेत पोहोचवणारी, शाळेतुन परत आणणारी, अभ्यास घेणारी... प्रत्येक स्त्रीमधे तो आशाळभूतपणे आई शोधतो आणि खुप दुखावतो. एकुण काय सगळी वजाबाकीच. दोन्ही अवस्था सारख्याच मी आई झाले आणि माझं पहीलं मुलं मोठं होतं असतानाच माझ्या नजरेने ते बरोब्बर ओळखलं.
आज त्याच मातेचा दिवस. मे महिन्यातला दुसरा रविवार. आपल्या भारतात मात्र प्रत्येक दिवस मातृ-दिनच असतो. जागतिक मातृ-दिनाच्या सर्वांना मनापासून खुप खुप शुभेच्छा...!
Have a nice and loving day !
सुनंदा वि. कुळकर्णी
७५१७२ ८१६३९

हृदयस्पर्शी... 👌👌
ReplyDeleteधन्यवाद ! आपलं नाव कळाले तर समजेल कोणाची प्रतिक्रिया आहे ते...
Deleteफारच सुंदर . मनाला भावणारी , आणि डोळ्यात पाणी आणणारी .
ReplyDeleteधन्यवाद ! आपलं नाव कळाले तर समजेल कोणाची प्रतिक्रिया आहे ते...
DeleteKhup bhavasparshi
ReplyDeleteधन्यवाद ! आपलं नाव कळाले तर समजेल कोणाची प्रतिक्रिया आहे ते...
Deleteहृदयस्पर्शी , डोळ्यात पाणी आलं.वाचुन क्षणभर मन स्तब्ध झाले 🙏🙏
ReplyDeleteधन्यवाद ! आपलं नाव कळाले तर समजेल कोणाची प्रतिक्रिया आहे ते...
DeleteKhupch Chan , Golden memory.

Delete