Wednesday 17 June 2020

नमस्कार !

नमस्कार हि जगातली फार सुंदर गोष्ट आहे. नम्र होण्याचा संस्कार म्हणजे नमस्कार. चुकून जरी कोणाला पाय लागला तरी नमस्कार करायची आपली भारतीय संस्कृती आहें. नमस्काराने देवसुद्धा वश होतो, मात्र नमस्कार भक्तिपूर्ण नामापासून आणि निरपेक्ष बुद्धीने केलेला असावा. 

दसरा, दिवाळी, गुढी-पाडवा, आपला स्वतःचा वाढदिवस, परीक्षेला जाताना तसेच नोकरीच्या मुलाखतीसाठी जाताना आणि अशाच काही महत्वाच्या गोष्टी करतांना आपण देवाला व घरातील वडीलधाऱ्या माणसांना आठवणीने नमस्कार करतो अन त्यावेळी घरातील आजी, आई, काका, वहिनी कोणीही आपल्या हातावर आवर्जून दही देतात. सगळं कसं छान आहे नं अगदी ! नमस्कार करणारा अगदी प्रसन्न मनाने आनंदात आपल्या कामाला जातो. 

शास्त्र सांगते, नमस्कार लहानांनी मोठ्यांना करावा. आई, वडील, गुरु, अतिथी यांना तर देव समजून नमस्कार करावा. साधू-संतांना तर लहान-मोठे कुणीही असो सर्वांनीच नमस्कार करावा. मग ते साधू संत आपल्यापेक्षा वयाने लहान असले तरी सुद्धा... आपला तो नमस्कार असतो, प्रपंचातील सर्व ऐहिक सुखाला तुच्छ मानून त्याकडे पाठ फिरविलेल्या त्यांच्या अपूर्व त्यागाला. सर्वांमध्येच देव आहे असे समजून प्रत्येकाचे कल्याण करणाऱ्या, त्यांच्यामध्ये सदैव जागृत असलेल्या त्यांच्या सत्प्रवृत्तीला...

श्रीमदभगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात -

समोऽहं सर्वभूतेषु न मे द्वेष्योऽस्ति न प्रियः । 

मी सर्व प्राणीमात्रात समभावाने व्यापून राहिलो आहे. मला ना कोणी प्रिय ना कोणी अप्रिय - तेव्हा अध्यात्म व परमार्थाचं म्हणणं आहे - प्रत्येक प्राणिमात्रांच्या अंतःकरणात भगवंतांचा वास असतो तेव्हा नमस्कार कुणीही कुणालाही करावा. 

मात्र विज्ञान कितीही पुढे गेले तरी जन्ममरणाची दोरी आपल्याच हातात ठेवणाऱ्या अदृश्य शक्तीला म्हणजेच परमेश्वराला (मग त्याला तुम्ही देव, निसर्ग , नियती , विश्वचक्र काहीही म्हणा) मात्र साधुसंतांसह सर्वांनीच नमस्कार करावा. त्यांच्यापुढे नतमस्तक व्हावं. त्याची मनापासून प्रार्थना करावी. 

नमस्कारात जबरदस्त ताकद असते. आपण मनातल्या मनात नमस्कार केला तरी नमस्काराचा परिणाम आशीर्वादच असतो. तो कोणालाही केलेला असला तरी, कर्तव्य म्हणून केला तरी, नुसता उपचार म्हणून केला तरी किंवा नाईलाज म्हणून अनिच्छेने केला तरी, ज्याला नमस्कार केला ती व्यक्ती वा शक्ती आशीर्वादच देते. अगदी तिच्याही नकळत तथास्तु !


श्रीमंत सुनंदा विष्णू कुळकर्णी

७५१७२८१६३९ 

(कृपया लेखावर कमेंट करतांना शेवटी आपल्या नावाचा उल्लेख करावा हि विनंती )

16 comments:

  1. खुपच छान . वाचुन खरचं खुपच आनंद झाला.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद खैरनार सर !

      Delete
  2. नमस्कार ।।

    खूप च छांन । भारतीय संस्कृती चा अभिमान वाटतो। आपल्या या शाब्दिक ज्ञानामृत बद्दल अभिनंदन व धन्यवाद। नमस्कार।। राजेंद्र मराठे , जळगांव।।

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद राजेंद्रजी !

      Delete
  3. सहजसुंदर लेख. नमस्कार="शब्देविण संवादु"
    काकूंना शि. सा. न.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद हेमंतराव !

      Delete
  4. खूपच सुंदर लिहिले आहे,काय आणि किती महत्त्व आहे एका नमस्कार करताना!आणि खरचं आहे की,विज्ञान कितीही पुढे गेले तरी ह्या गोष्टींपासून विज्ञान अजुनही लांबच आहे.नमस्ते काकू 🙏🙏🌹

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद ! कृपया कमेंट मध्ये आपले नाव लिहिल्यास कळेल.

      Delete
  5. वा,अतिशय उत्तम माहिती श्रीमती आईंना साष्टांग नमस्कार
    अनंत कुळकर्णी बोदवड

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद अनंतराव !

      Delete
  6. उत्तम लेख !!!
    नमस्कार .

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद ! कृपया कमेंट मध्ये आपले नाव लिहिल्यास कळेल.

      Delete
  7. धन्यवाद ! कृपया कमेंट मध्ये आपले नाव लिहिल्यास कळेल.

    ReplyDelete
  8. छानच ..
    कल्याणी पाठक (वृषाली काटे)

    ReplyDelete
  9. खूपच छान आजी...😊😊😊

    ReplyDelete

वेळा

गेलेली वेळ कितीही पैसे मोजले तयारी विकत घेता येत नाही आणि आलेल्या योग्य वेळेचा योग्य तो उपयोग करुन तीच फायदा घ्यायचा असेल तर त्या वेळेसाठी ए...